Posts

पाय

पाय सुधाकर आबांचा पाय गुडघ्यापासून कापणार,ही माहिती आयकून मन सुन्न झालं.मोठ्या कष्ठाने उभारलेल्या आयुष्याच्या सायंकाळी पाय कापावा लागणार म्हणजे खूपच वाईट. मुद्दामहून भेटण्यासाठी मी औरंगाबादला गेलो.घाटी रुग्णालयात जनरल वार्ड खचाखच भरलेले होते.खाटावर जागा नसल्याने,आबांची तात्पुरती सोय गॅलरीत एका कोपऱ्यात केली होती.खाली सतरंजी अंथरून आबा व आबाई (माझ्या काकू) दोघे बसले होते. कडक उन्हाळ्याचे दिवस असल्याने,आबा घमेघुम झालेले होते.डावा पाय पुढे करून दोन्ही हातांनी बागायतदाराच्या साहाय्याने मानेवर व तोंडावर हवा मारत होते.डाव्या पायाच्या टाळव्याला भलेमोठे बँडेज बांधलेले होते. मी आबा जवळ गेलो, फळांची कॅरी बॅग त्यांच्याजवळ ठेवून त्यांच्या समोर बसलो.आबांनी पायाकडे बघत खुणेनेच पाय कापणार असल्याचे सांगितले.काकू रडायला लागल्या,आबांचा चेहरा मात्र निर्विकार. 'कस काय झालं आबा ?' मी म्हटलं. आबा शांत. काकू म्हणाल्या,"धस्कट घुसल होतं. तळव्याच्या मधोमध,डायबिटीस हाय ना,बरच होईना. डॉक्टर म्हणता गुडघ्यापासून पाय कापावा लागेल." मी म्हटलं,"आबा,सर सलामत तो पगडी पचास, पाय कापला तरी ...